---Advertisement---

संतापजनक! १९ वर्षीय तरुणीचा तिकीट निरीक्षकानेच केला विनयभंग

---Advertisement---

जळगाव : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. अशातच एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा तिकीट निरीक्षकानेच विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

कानपुरातील रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी २२ रोजी कानपूर ते पुणे असा प्रवास गोरखपूर-बंगळुरू विशेष ट्रेनने करीत होती, मात्र सेकंड एसीचे तिकीट आरएसी असल्याने तिने तिकीट निरीक्षकाची भेट घेत त्यांना बर्थ देण्याची मागणी केली. गाडीतील तिकीट निरीक्षक तिवारी याने फर्स्ट एसीमध्ये पाच क्रमांक सीट दिले.

तरुणी सीटवर झोपण्यासाठी गेल्यानंतर आरोपी तिकीट निरीक्षकाने तिचा विनयभंग केला तसेच पीडिता वॉशरूममध्ये गेल्यानंतरही संशयित बाहेर थांबून राहिला.

भुसावळ स्थानक येईपर्यंत हा प्रकार घडला. पीडितेने वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, हा गुन्हा भुसावळात वर्ग होताच तिकीट निरीक्षक तिवारी यास ताब्यात घेत त्याची चौकशी केली तसेच त्यास नोटीस बजावून त्याची सुटका केली. तपास लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर जंजाळकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment