---Advertisement---

पाचोऱ्यात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार; धाड टाकत पोलिसांनी मुला-मुलींना पकडले!

---Advertisement---

पाचोरा : शहरातील एका बंद कॉफीशॉपमध्ये भलताच प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. पाचोरा पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कॉफीशॉप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील नवकार प्लाजा येथे एक बंद असलेलं कॉफीशॉप आहे. या कॉफीशॉपमध्ये कुठलेही पेय अथवा खाद्यपदार्थ विकले जात नाही. तसेच कॉफीशॉपचा परवानादेखील नाही. मात्र, तेथे संशयित आरोपी समाधान संजय भोई (वय २३, रा. बहिरम नगर, पाचोरा) याने काही तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी ४ कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले.

दरम्यान, याची कुणकुण पाचोरा पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी, २५ रोजी सकाळी साडे अकरा वाजता धाड टाकली. या वेळी पोलिसांना ४ कंपार्टमेंटयामध्ये लाकडी टेबल, खुर्च्या टाकून व कापडी पडदे लावलेल्या स्थितीत दिसले. तेथे काही प्रेमीयुगुल व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अश्लील चाळे करताना आढळून आले.

दरम्यान, पोलिसांकडून त्यांना समज देत सोडून देण्यात आले. पडदे, खुर्च्या अशा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ राहुल शिंपी, संदीप राजपूत, उपनिरीक्षक अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी कॉन्स्टेबल सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून कॉफीशॉप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली कॉ. राहुल शिंपी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment