Extramarital affair : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका योग शिक्षकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जगदीप असे हत्या झालेल्या योग शिक्षकाचे नाव आहे.
धक्कादायक म्हणजे, संतापलेल्या नवऱ्याने या शिक्षकाचे अपहरण केले, त्यानंतर बेदम मारहाण करून त्याला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरले. दरम्यान, या घटनेचा तब्बल तीन महिन्यांनी उलघडा झाला असून, या प्रकरणी पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हरियाणाच्या रोहतकमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप हा झज्जर जिल्ह्यातील मंदोठी गावाचा रहिवासी असून, तो २४ डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता. या घटनेच्या तब्बल १० दिवसांनी त्याच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होतीमात्र, तीन महिन्यांपर्यंत कोणताही सुगावा लागला नव्हता.
दरम्यान, पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू केला असता २४ मार्च रोजी जगदीप याचा मृतदेह एका सात फूट खड्ड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप हा बाबा मस्तनाथ विद्यापीठात योग शिक्षक म्हणून कार्यरत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, जगदीप हा ज्या घरात भाड्याने राहत होता, तिथेच त्याची एका विवाहित महिलेशी जवळीक वाढली.
दरम्यान, या प्रेमप्रकरणाची माहिती महिलेच्या नवऱ्याला मिळाली. त्याने आपल्या साथीदारांसह मिळून जगदीप याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. तसेच हात-पाय बांधून त्याला सात फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं.
या घटनेचा तब्बल तीन महिन्यांनी उलघडा झाला असून, या प्रकरणी पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे.
पोलिस अधिकारी कुलदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण प्रकरण उघड होईल. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.