मुंबई : महाराष्ट्रातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून, आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
काय आहे निर्णय?
महाराष्ट्रातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून, याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं होणार सोपं
निर्णयामुळे आता राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपं होणार आहे. यापूर्वी १९९० मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. या निर्णयामुळे आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत.
भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी म्हणजे काय?
ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2.