---Advertisement---

आर्मीत भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण, रामीतील तरुणाने अचानक उचलले टोकाचे पाऊल

---Advertisement---

धुळे : परिस्थितीत बीएस्सीचे शिक्षण घेऊन आर्मीमध्ये भरती होण्याची तयारी करणाऱ्या रामी, जि. धुळे येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, २५ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तरुणाने आत्महत्या का केली ? याचे ठोस कारण समोर आले नाही. मात्र अत्यंत होतकरू व उमद्या तरुणाच्या जाण्याने रामी गावात शोककळा पसरली आहे. अक्षय यशवंत माळी (२९, रामी, ता.धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

देशसेवा करण्यासाठी आर्मीत भरती होण्याची तयारी करणाऱ्या तरुणाने अचानक उचललेल्या टोकाच्या पावलानंतर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रामी येथील माळी कुटुंबाची भेट घेतली. कष्टकरी शेतकरी व माळकरी प्रतिकुल असलेले यशवंत माळी या वेळी म लाच्या अकाली जाण्याने धाय मोकलून रडले व हतबल पित्याचे अश्रू पाहून या वेळी कणखर मात्र तितक्याच हळव्या मनाच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही गहिवरून आले.

आपल्या अश्रृंना वाट मोकळी करून देताना यशवंत माळी म्हणाले की, मुलाला कधीही शेतात कष्ट करण्यासाठी ये म्हटलो नाही, तुला हवे ते शिक्षण घे म्हटलो. मात्र ज्याला अंगा खांद्यावर खेळवले त्याच मुलाला खांद्यावर नेण्याची दुर्दैवी वेळ आली, दोन दिवसांपासून झोपलो नाही, मुलाचा सारखा चेहरा समोर येत असल्याचे माळी सांगत असताना धाय मोकलून रडू लागले. हतबल पित्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून कणखर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संवेदनशील मनाच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही या वेळी गहिवरून आले.

रामी गावातील अक्षय माळी हा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी झटत होता. कुटुंबातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र एक ते दोन मार्कानी त्याची संधी हुकत असल्याचे शल्य त्यास बोचत होते. मोडळ नदीजवळील शेतात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अक्षयने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही वार्ता कळताच अक्षयला हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलवल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सोनगीर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय बोरसे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment