---Advertisement---

IPL 2025 : आज चेन्नई-बंगळुरू आमनेसामने, शेन वॉटसनचं आरसीबीला आवाहन!

---Advertisement---

चेन्नई : १८व्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट हंगामात आज, शुक्रवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर आरसीबी आणि सीएसके यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे.

एकूणच दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकला असल्याने दोन्ही संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण चेन्नई संघाने नेहमीच घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे. विशेषतः फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर चेन्नईला हरवणे आरसीबीसाठी सोपे नसेल. एकूणच आता या सामन्यात कोण जिंकत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

आरसीबी संघासमोर मोठे आव्हान – शेन वॉटसन
शेन वॉटसन म्हणाला की, या मैदानावर खेळताना आरसीबी संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. प्रामुखाने चेन्नईकडे असलेली गोलंदाजीतील खोली पाहता आरसीबी संघाला रचना बदलावी लागणार आहे. तरीही एखादी चूकही त्यांना महागात पडू शकेल. चेन्नईकडे दर्जेदार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत आणि घरच्या मैदानावर त्यांची ताकद अधिकच वाढते. अश्विन-जडेजा आणि नूर अहमद हे तिघे फिरकी गोलंदाज फारच धोकादायक ठरू शकतात, असे वॉटसनने सांगितले.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिखारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment