---Advertisement---

बनावट ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे दुचाकी विक्री; मुक्ताईनगरातील प्रकार

---Advertisement---

जळगाव : बनावट ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे दुचाकी विक्री आणि सर्व्हिसिंग सुरू असल्याचा प्रकार मुक्ताईनगरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव आणि परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर शहरातील ओम श्री. मोटर्स हिरो शोरूममध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार श्रावण काशिनाथ धाडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, हा ट्रेड सर्टिफिकेट गट क्रमांक 576 व प्लॉट क्रमांक 3/1 या पत्त्यावर नोंदणीकृत आहे. मात्र, त्या जागेवर 28 मार्च 2021 पासून एचडीएफसी बँक आणि सप्टेंबर 2022 पासून मल्टी को-ऑपरेटिव्ह बँक राजश्री शाहू सुरू आहे. त्यामुळे या शोरूमला हे सर्टिफिकेट कसे आणि कोणत्या आधारे रिन्यूअल करण्यात आले, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

तक्रारदार श्रावण काशिनाथ धाडे यांच्या म्हणण्यानुसार, ओम श्री मोटर्स हिरो शोरूम गट क्रमांक 561/1/2/38 ब यास्थळी सुरू असून, सदर जागा जितेंद्र सरोदे यांची मालकी आहे. मात्र, शोरूम दुसऱ्या पत्त्यावरील बनावट ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे सुरू असल्याचा संशय असून, हे सर्रासपणे ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे.

या प्रकरणानंतर फक्त हिरोच नव्हे, तर नेक दुचाकी शोरूमदेखील अनधिकृतपणे सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील अशा बोगस शोरूमवर तात्काळ कारवाई करून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment