नवापूर : येथील बस स्थानकात एसटी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली. परिणामी दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र, या अपघातात दोन दुकान मालक व दोन शाळकरी मुली जखमी झाल्या आहेत. दरम्यान, उभी बस कशी सुरु झाली, का चालकाने बस बंद न करता उभी केली होती, हँड ब्रेक लावला होता तर कोणी काढला, असे अनेक प्रश्न नागरिकांनी केलेय, मात्र यावर आगार प्रमुख अनुत्तरित आहेत.
नवापूर बसस्थानक परिसरात नेहमी प्रमाणे १२ ते साडेबाराच्या दरम्यान नवापूर- भोमदीपाडा (M.H 14. B T 2114) ही बस उभी होती. त्या बस मध्ये विद्यार्थी बसले होते. उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानका समोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसली. या घटनेत दोन्ही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहे तर दुसऱ्या दुकानाचे मालक माज अजिम पठान, विद्यार्थीनी स्टीलिना गणेश गावित (वय 8 वर्ष रा रायगंण ) आदर्श प्राथमिक विद्यालय नवापूर येथे इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारी मुलगी आहे.
तर सोनाली अनिल गावित (वय 13 वर्ष राहणार रायगणं ) सार्वजनिक हायस्कूल येथे 6 वी ला शिकत आहे. या मुली व दुकान मालक माज अजिम पठान हे अपघातात जखमी झाले आहेत. तिघांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एसटी बस नवापूर येथून करंजी भोमदीपाडा दुपारी साडेबारा ला सुटणार होती. मात्र त्याआधीच बस सुरु होवून दुकानात घुसली. बेकाबु बसला खाजगी वाहणाचा चालक रोहिदास खैरणार, बसस्थानक परिसरातील ट्राफिक पोलीस विकी वाघ, जितेंद्र कोकणी यांनी आपली जिवाची परवा न करता बसमध्ये चढुन बसचा ब्रेक दाबून बस थाबवली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. घटनास्थळी लोकांनी एक गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानकावर येथे जाऊन पहाणी केली. बस मध्ये बसलेले विद्यार्थी अंत्यत भयभीत झाले होते. या प्रसंगी रोहीदास खैरणार, पोलिस विकी वाघ, जितेंद्र कोकणी यांनी आपली जिवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढुन ब्रेक दाबून बेकाबु बस थाबविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस ही बसस्थानकावर उभी होती त्या बस मध्ये चालक वाहक नव्हते.
फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते. अचानक बस सुरू झाली कशी झाली ? बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती. बस अचानक सुरू झाली कशी, काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे यावर जनमानसात चर्चा सुरु आहे. जखमीवर डॉ कुंदन ब्रेद्रे, रेचल वळवी यांनी औषध उपचार केले. बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.
नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे. या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत. घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे. सत्य काय ते समोर येईल अशी माहिती आगार प्रमुख विजय पाटील यांनी दिली.