धरणगाव : तालुक्यातील बहुतांश भागातील बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह तुरळक पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात बाजरी, मका, दादर आणि गव्हाच्या पिकांसह कापणीला आलेले पीक आडवे झाले असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात अचानक बदल झाला आहे. त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पिके आडवी पडली असून, काही ठिकाणी तुटून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मोठा फटका बसणार असून उत्पन्नात घट निर्माण होण्याची चिन्हे दिसु लागली आहेत.
तसेच बुधवार रात्री परीसरातील विजेचा कडकडासह जोरात वारावादळ व पाऊस आल्याने उत्पादनावर मोठा परीणाम होणार असल्याने शेतकरी भयभीत झाला आहेत. वाऱ्यामुळे विशेषतः बाजरी, मका दादर आणि गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गव्हाच्या दाण्याला भर येण्याच्या काळात अशा प्रकारची आपत्ती आल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. मक्याच्या पिके आडवी झाली असून, काही ठिकाणी संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे. बाजीच्या कणसांवरही परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सद्या तालुक्यातील पुर्वत्तर भागातील ग्रामीण शिवारात अनेक गावांना या अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे. काही गावांमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतात उभे असलेले पीक आडवे झाले आहे पिंपळे बुद्रुक पिंपळे खुर्द गंगापुरी,पष्टाणे,साळवा, साकरे, नांदेड तसेच अनोरे धानोरे पिप्री सोनवद सह आदी गावात सोसाट्याचा वारा वाहत आहे.
दोन दिवसांपासून तालुक्यात पाऊस-वादळाची भीती
दिवसभर ढगाळ वातावरण आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा वर्तवलेला हवामानाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गारपीटसदृश परिस्थिती असल्यामुळे धरणगाव परिसरातील लिंबू व आंब्याच्या कहीरी देखील वादळाचा चपट्यात सापडले आहेत. बहुतांश भागातील कैरी वादळामुळे खाली कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्गात पसरली आहे. दि. ३१ रोजी रात्री झालेल्या तुरळक पाऊस व वादळामुळे कापणीवर आलेल्या ज्वारी, गहू हरभरा त्याचबरोबर उपटून ठेवलेला उन्हाळी कांदा, फळबागां मध्ये लिंबू, केळी, आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.तरी प्रशासकीय पातळीवर नुकसानग्रस्त शेतकरीना मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने ३ एप्रिल आणि ४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे.