धुळे : जिल्हासह धुळे तालुक्यातील अनेक गावात झालेल्या वादळ व अवकाळी पाऊसामुळे शेतमालचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, या संदर्भातील सूचना धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकऱ्यांना दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हातील काही ठिकाणी पाऊस व वादळी वारे मुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे मुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बुधवारी विजेच्या कडकडाटसह सायंकाळी जोराचे वादळ सुटले व पाऊसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांचे शेतात काढणी साठी ठेवलेले गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा तयार होता परंतु या अवकाळी पाऊसामुळे खराब झाला आहे. काही भागात गारपीट झाली आहे यामुळे फळ बागांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावातून आमदार राम भदाणे यांना शेतकऱ्यांनी संपर्क करून नुकसानीची माहिती दिली.
शेतकऱ्यांचा शेतमालाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे. अशी सूचना आ. भदाणे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकऱ्यांना दिल्या आहे. तथा नुकसान झालेल्या नागरिकांनी पंचनामे करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आ. भदाणे यांनी केले आहे.

काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास नेर, लोणखेडी, लोहगड,नांद्रे उभंड,कावठी, शिरधाने, खंडलाय, हेंद्रूण,या गावांमध्ये आणि पंचक्रोशी मध्ये वादळाचा मोठ्या प्रमाणात तडाका बसला वादळासह गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी बांधवांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले देवेंद्र पाटील शंकर खलाणे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी महसूल विभागाचे मंडल अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक सर्वांनी मिळून संयुक्त पंचनामे केले व शेतकरी बांधवांसोबत चर्चा करून त्यांना दिलासा दिला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावसाहेब यांच्याशी देखील संपर्क झाला.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदादा भदाणे यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्वांची संपर्क साधून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या पालकमंत्री नामदार जयकुमार रावल साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांची संवाद साधून नुकसानीचे पंचनामे करून शासनास तातडीने सादर करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या.