---Advertisement---

Maharashtra SSC Result 2025 Update : यंदा लवकर लागणार दहावीचा निकाल

---Advertisement---

पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा संपून काही कालावधी लोटला असून विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाकडे राहणार आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही दहावी (Maharashtra SSC Result 2025) , बारावीचा निकाल लवकर लागणार आहे. या वर्षी निकाल १५ मेच्या आधीच लावण्याची बोर्डाची तयारी आहे.

यंदा दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. यावर्षी १५ मेच्या पूर्वीच निकाल लावण्याची तयारी बोडनि केल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे लगेचच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते.

शिक्षकांनी आत्मसात केली एआय आधारित कौशल्ये

शिरपूर : आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएम-उषा) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) आणि आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय (शिरपूर) यांच्यातर्फे आयोजित विद्यापीठाचे संलग्नित शिक्षकांचे तंत्रविज्ञान आणि अध्यापनशास्त्रीय ज्ञान विकसित होण्यासाठी ‘कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर टीचर्स’ कार्यशाळा उत्साहात झाली. कार्यशाळेतून शिक्षकांनी एआय आधारित कौशल्ये आत्मसात केली.

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. दीपक बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील प्रा. राम ताकवले संशोधन आणि विकसन केंद्राचे समन्वयक डॉ. वासुदेव राऊत, एस. पी. डी. एम. महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. प्रेमकिरण भदाणे, आर. सी. पटेल वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील व डी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एल. चौधरी उपस्थित होते.


डॉ. दीपक बाविस्कर यांनी प्रास्ताविकात भारतीय शिक्षणाच्या इतिहासातील १९६४ च्या राष्ट्रीय शिक्षण आयोगापासून ते २०२० च्या राष्ट्रीय शिक्षण आयोगापर्यंत शिक्षणात झालेले बदल, शिक्षक प्रशिक्षणात झालेले बदल आणि अध्यापनात वापरली जाणारी तंत्रज्ञान कालपरत्वे कशी बदलत गेले यावर दृष्टिक्षेप टाकत एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर संशोधनात आणि अध्यापनात कसा करता येऊ शकेल, याबद्दल मत मांडले.

कार्यशाळेचे संयोजक डॉ. तुषार माळी, सहसंयोजक डॉ. गजानन खेकाडे यांनी संयोजन केले. कार्यशाळेस विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील ४० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. दोनदिवसीय कार्यशाळेत आठ सत्रे घेण्यात आली. यापैकी पहिली चार सत्रे पहिल्या दिवशी, तर नंतरची चार सत्रे दुसऱ्या दिवशी झाली. डॉ. वासुदेव राऊत, प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील, डॉ. प्रेमकिरण भदाणे, प्रा. डॉ. शिवानी मिश्रा, डॉ. कैलास चौधरी आदींनी चर्चेत सहभागी होत मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी डॉ. मिलिंद बचुटे यांनी कार्यशाळेतील अनुभव व काय नवे प्राप्त झाले आणि त्याचा उपयोग आम्ही कसा करणार याबद्दल विचार मांडले. डॉ. ज्योती महाशब्दे यांनी कार्यशाळेतील अनुभव मांडले.

प्राचार्य डॉ. दीपक बाविस्कर यांनी बदलत गेलेले शिक्षणातील तंत्रज्ञान शिक्षकांना नवे अनुभव देत जाते व त्यातून शिक्षकाची तंत्रज्ञान साक्षरताही वृद्धिंगत होत जाते म्हणून अशा कार्यशाळेतून प्राप्त झालेले ज्ञान प्रत्यक्षात आणणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. जया बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रिया एन. कुरकुरे यांनी आभार मानले. प्रत्येक सत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांची ओळख सहसंयोजक डॉ. गजानन खेकाडे यांनी केली. कार्यशाळेसाठी डॉ. व्ही. एस. पुराणिक, डॉ. योगिनी धाकड, डॉ. प्रिया कुरकुरे, ईश्वर बोरसे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment