विजय बाविस्कर
पाचोरा : शहरात श्री. हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यात सहभागी झालेल्या भक्तांना अग्रवाल समाज, केसरी नंदन चारिटेबल ट्रस्ट, जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी फ्रेंड्स ग्रुप, बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याचे पाणी वितरण केले. यावेळी जवळपास चार ते पाच हजार भक्तांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.
जामनेर रोडवरील मानसिंगा का कॉर्नर सत्यम बुक या दुकानाजवळ भव्य मंडप उभारून भक्तगणांना पिण्याचे पाणी वितरण केले. यावेळी श्री हनुमान चालीसा व हनुमान गीत गाण्यात आले. दरम्यान, अग्रवाल समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केसरी नंदन चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अग्रश्री मोहन अग्रवाल, फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष अग्रश्री सीताराम अग्रवाल , महावीर अग्रवाल, महावीर गौड, दिलीप मुथा, राजेश पटवारी, गोपाल पटवारी, रमेश अग्रवाल, संजू पटवारी, नयन मुथा श्रीकांत मुथा, दिनेश अग्रवाल, पंकज बांठिया, निर्मल पटवारी, रमेशजी मोर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.