---Advertisement---

Heatstroke care tips : नागरिकांनो, उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

---Advertisement---

Heatstroke care tips : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशा वाढलेल्या तापमानात सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा उष्माघाताने (Heatstroke care tips) मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्ही उष्माघातापासून बचाव करू शकाल, चला जाणून घेऊया काय आहेत या टिप्स.

वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच अनेक भागांत तापमान वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चाळीशीपार गेला. सकाळी ११ वाजत नाहीत, तोच सूर्याचे चटके अंगाला बसत आहेत. दुपारी शहरातील रस्त्यांवर कर्फ्यूसदृश्य स्थिती बघायला मिळत आहे.

उन्हाळ्यात दुपारी घराबाहेर जाणे टाळलेच पाहिजे, जर नियमित कामे असतील तर त्यांनी घराबाहेर पडताना डोक्यावर गमजा, टोपी, डोळ्यावर चांगल्या दर्जाचा गॉगल वापरणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असल्याने नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. शक्यतो, दुपारी घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान तीन डिग्री सेल्सिअसने जास्त असल्यास त्याला उष्णतेची लाट संबोधले जाते. एप्रिल, मे व जून या महिन्यांत उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो. त्यामुळे मृत्यूही होण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात घराबाहेत पडताना भरपूर पाणी प्या. दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या. हलके आणि सैलसर कपडे परिधान करा. उष्ण हवामानात सुती कपडे घाला. थेट उन्हापासून बचाव करा. शक्यतो ११ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळा. शारीरिक श्रम कमी करा, प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा. योग्य आहार, फळांचे रस, नारळपाणी, ताक यांचा समावेश आहारात करा. तसेच अधिकाधिक पाणी पिऊन शरीरातील पाणीपातळी संतुलित ठेवावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment