Yaval crime : शहरातील मेन रोडवरील बारी चौकात यशवंत मेडिकलच्या पुढे एका ५४ वर्षीय महिलेसोबत पाच जणांनी वाद घालत तिला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. ही घटना १४ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेला ठार मारण्याची धमकी
शहरात मेन रोडवरील बारी चौकाच्या पुढे यशवंत मेडिकल आहे. या मेडिकलच्या समोर ५४ वर्षीय महिला उभी असताना विष्णू टीकाराम पारधे, आकाश विष्णू पारधे, मंगलाबाई विष्णू पारधे, पूजा पारधे, शारदा विष्णू पारधे हे पाच जण आले व त्यांनी महिलेशी वाद घालत अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला व ठार मारून टाकण्याचीदेखील धमकी दिली.
या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध महिलेचा विनयभंग करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नीलेश चौधरी करीत आहे.