केदारनाथ : केदारनाथ धाम हे हिंदु बांधवांसाठी सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून, ते तब्बल ३,५८३ मीटर उंचीवर आहे. येथे चारधाम यात्रेला असंख्य भाविक दाखल होत असतात. या पार्शभूमीवर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थात भाविकांसाठी कठोर नियम केला असून, जर भाविकांनी या नियमाला अनफॉलो केलं तर त्यांना चारधाम यात्रेला मुकावं लागण्याची शक्यता आहे. Kedarnath helicopter booking 2025
चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने कठोर नियम केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, यंदा भाविकांना नोंदणी अनिवार्य केली आहे. अर्थात नोंदणी केल्यानंतरचं भाविकांना चारधाम यात्रेला जाता येणार आहे. त्यामुळे जर भाविकांनी या नियमाला अनफॉलो केलं तर त्यांना चारधाम यात्रेला मुकावं लागण्याची शक्यता आहे. Kedarnath Yatra 2025
हेलिकॉप्टर सेवेचं बुकिंग
तसेच चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यात आली असून, याचे बुकिंग २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण हेलिकॉप्टर शटल सेवाचे बुकिंग हे फक्त आयआरसीटीसी हेली यात्रेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे करता येणार आहे.
सर्वप्रथम करा हे काम?
उत्तराखंड सरकारच्या अधिकृत वेबसाइटला (नोंदणी आणि पर्यटक काळजी) भेट देऊन तुमच्या चारधाम यात्रेसाठी नोंदणी करा. त्यानंतर IRCTC हेली यात्रेला भेट द्या आणि सीट उपलब्धता तपासण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक वापरून हेली यात्रा प्रोफाइल तयार करा. आवश्यक माहिती भरा, तुमच्या पसंतीचा स्लॉट निवडा. तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन पेमेंट करून तुमचे बुकिंग पूर्ण करा. केदारनाथ यात्रेसाठी हेलिपॅडवर जाताना, तुमचे हेलियात्रेचे तिकीट सोबत बाळगायला विसरू नका.
भाविकांनो, हे लक्षात घ्या
हेली प्रवासाचे तिकीट बुक करण्यासाठी, प्रथम ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचे हेली प्रवासाचे तिकीट बुक केल्यानंतर, त्याची प्रिंट आउट घ्या. डिजिटल स्वरूपात तिकिटे स्वीकारली जाणार नाहीत.
सर्व प्रवाशांनी सोबत वैध ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे.