---Advertisement---

Health Care : चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका ‘ही’ फळे अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

---Advertisement---

Health Care :  उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, आपण फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी अनेकदा फ्रीजचा वापर करतो. परंतू काही काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ती खराब आणि त्यावर प्रक्रिया होऊन ती विषारी होण्याचा धोका असतो.

त्यामुळे, सर्व प्रकारची फळे फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही निवडक फळे फ्रीजमध्ये ठेवू शकता.तर आपण अशा फळांबद्दल जाणून घेऊ जे फ्रिजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे.

टरबूज

बरेच लोक टरबूज लवकर खराब होऊ नये म्हणून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करतात. तथापि, असे केल्याने त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि त्याचे पौष्टिक मूल्य देखील कमी होते. म्हणूनच तज्ञ टरबूज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये अशी शिफारस करतात.

सफरचंद

सफरचंदामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे आणि सक्रिय Enzymes मुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यावर लवकर पिकते. परिणामी हे फळ लवकर पिकल्यामुळे ते खराब होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला ४-५ दिवसांसाठी सफरचंद फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, असल्यास तुम्ही कागदामध्ये रॅप करून किंवा गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

केळी

केळीच्या देठापासून इथिलीन नावाचा वायू बाहेर पडतो, ज्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवल्यावर झपाट्याने काळी होतात. यासह, हे आसपासच्या फळांना देखील खराब करते. फ्रिजमधील थंड तापमान केळीच्या सालींचे पिकण्याचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे केळी लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच, त्यांची टेस्ट पूर्णपणे निघून जाऊ शकते. म्हणूनच केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका.

संत्रा आणि लिंबू

संत्री, लिंबू यांसारखी फळे सायट्रिक ऍसिडने समृद्ध असतात आणि थंड वातावरणात त्यांचा वाईट परिणाम होऊ शकतो. ही फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यांची चव बदलू शकते आणि त्यांचे पोषण देखील कमी होऊ शकते. संत्रा, लिंबू या फळांमध्ये अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. ही फळे फ्रीजची थंडी सहन करू शकत नाहीत. म्हणूनच ते फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment