---Advertisement---

उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा – डॉ. के. बी. पाटील, रावेरला जागतिक केळी दिन उत्साहात साजरा

---Advertisement---

रावेर : जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते. मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सर्वांगिण दृष्टीने विचार केला असता केळी हे पौष्टीक फळ आहे त्याचे दैनंदिन जीवनशैलीच्या आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राहिल त्यासाठी दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र समजून घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ. के. बी. पाटील यांनी केले.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्यातर्फे रावेर येथे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी म्हणजे आज जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. रावेर पिपल्स बँकेजवळ, रावेर येथे येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. के. बी. पाटील बोलत होते.

केळी हे न्युट्रीशनचा प्रचंड मोठा स्त्रोत

के. बी. पाटील पुढे म्हणाले की जागतिक केळी दिन सर्वप्रथम युरोपीयन व अमेरिकियन देशांमध्ये साजरा केला जातो. केळी फळातील पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचे सेवन वाढावे यासाठी केळी दिवस साजरा करण्यामागील भूमिका तसेच जागतिकस्तरावर केळीला अन्नघटकांपैकी महत्त्वाचे मानले जाते. प्रवासामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि खाता येणारे सुरक्षित असे फळ असल्याचे डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले.

जैन इरिगेशन गेल्या चाळीस वर्षापासून केळीच्या विकासासाठी काम करत होते. ठिबक सिंचन, फर्टिगेशन, पॅकेजिंग प्रॅक्टीसेस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, केळी लागवड व काढणी पश्चात फ्रुटकेअर मॅनेजमेंट या सर्व गोष्टींमुळे केळीच्या पिकांमध्ये आज क्रांती झाली. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या समृद्धी आली. मात्र ज्या पद्धतीने अमेरिकन, युरोपीयन किंवा आखाती देशांमध्ये भारतापेक्षाही जास्त केळीची मागणी आहे. टांझानिया, युगांडासह अन्य देशांमध्ये वर्षाला एक माणूस ४०० किलो केळी खातो. साधारणपणे संपूर्ण आफ्रिकन देशांचा विचार केला तर सरासरी केळी खाण्याचे जे प्रमाण आहे ते अर्धा किलो ते एक किलो आहे. त्यांच्या आहारामध्ये केळी ला विशेष असे महत्त्व आहे. मात्र भारत देशाचा विचार केला तर आपण फक्त वर्षाला १३ किलो केळी खातो.

जपान मध्ये साधारणत: वर्षाला १६ किलो केळीचे सेवन केले जाते. युरोपमध्ये साधारणपणे २९ किलो, युएसमध्ये वर्षाला २३ किलो केळी एक मनुष्य सेवन करतो. भारत हा जगातील केळी उत्पादनातील सगळ्यात पहिल्या क्रमांचा देश आहे. जगाच्या उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपण उत्पादित करतो परंतू केळी दिनाचे जे औचित्य आहे त्यातून केळीबाबतची जागरूकता वाढावी. केळी खाण्याचे प्रमाण वाढावे. कारण केळी हे न्युट्रीशनचा प्रचंड मोठा स्त्रोत आहे. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फर, पोटॉशिअम, विटॉमिन बी-६ यासह अन्य अन्नघटक आहेत. दररोज एक केळीचे सेवन केले तर विटॉमिन बी-६ ची पुर्तता शरिरात होते. केळी व केळीपासून तयार होणारे मिल्क शेक चे सेवन केले पाहिजे. ईश्वराने नैसर्गिक पॅकेजिंग केलेले केळी हे फळ आहे. त्याला प्रवासासह कुठेही सेवन करता येते. ती नैसर्गिक रित्या आरोग्याला सुखकर आहेच निसर्गाचं सुद्धा पालन पोषण करणारं हे फळ आहे. त्यामुळे त्याचे आरोग्याच्या दृष्टीने आहारात रोज सेवन करा असे आवाहन डॉ. के. बी. पाटील यांनी केले.

माजी आमदार अरूण पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा करण्याचा उपक्रम म्हणजे नवचैतन्य निर्माण करणारा आहे. जास्त लागवडीपेक्षा निर्यातक्षम गुणवत्ता पूर्ण उत्पादनावर शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

यांचा झाला सत्कार

याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, माजी आमदार अरूण पाटील, केळी महासंघाचे भागवत पाटील, माऊली हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी यांच्या हस्ते केळीचे खोड व घड याचे पूजन करण्यात आले. यावेळी रामदास पाटील-निंबोल, विशाल अग्रवाल, प्रशांत महाजन, सदानंदन महाजन, प्रफूल्ल महाजन, उज्ज्वल अग्रवाल, हरी भिका पाटील, पांडुरंग पाटील, अतुल मधुकर पाटील, यश पाटील, अमोल पाटील-बलवाडी, शैलेंद्र पाटील-शिंगाडा, निलेश पाटील-अजंदा, मंदार मनोहर पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे वितरक सोपान पाटील, गुलाब पाटील, आर. जी. पाटील यांची उपस्थिती होती. जैन इरिगेशनतर्फे मान्यवरांचे रूमाल टोपी देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर केळी व केळीच्या ज्यूस चे वाटप केले गेले. यावेळी केळी दिनानिमित्त विशेष सजावटीसह तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर शेतकऱ्यांसह नागरिकांनी सेल्फी काढले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहूल भारंबे, मोहन चौधरी, चेतन गुळवे, तुषार पाटील, शुभम पाटील, भास्कर काळे, सागर मोरे, यतिश चौधरी, तुषार हरिमकर यांच्यासह जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूड्स चे सहकारी यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment