IPL 2025 : आरसीबी आणि उबरमध्ये एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद त्या जाहिरातीबद्दल आहे ज्यात आयपीएलमध्ये ‘एसआरएच’साठी खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड दिसत आहे. आरसीबीच्या मते, ही जाहिरात “रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू” असे म्हणत खिल्ली उडवतेय. दरम्यान, हे प्रकरण आता उबर-इंडियाला महागात पडताना दिसत आहे, कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यावर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या प्रकरणात खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की जाहिरातीत वापरल्या गेलेल्या भाषेमुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिमा मलिन झाली आहे. आरसीबीने म्हटले आहे की, असे करून त्यांनी थेट त्यांच्या ट्रेडमार्कवर हल्ला केला आहे. त्यांच्या मते, जाहिरातीत हे फक्त थट्टा करण्याच्या उद्देशाने केले गेले असावे.
फक्त नावच नाही तर घोषणेचीही उडवली गेली खिल्ली – आरसीबी
फक्त आरसीबीच्या नावातच नाही. फ्रँचायझीने न्यायालयाला सांगितले की, जाहिरातीत त्यांच्या आवडत्या घोषणेची “ई साला कप नामदे” चीही खिल्ली उडवण्यात आली आहे. आरसीबीच्या मते, ते घोषवाक्य संघ आणि चाहत्यांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहे. अशा परिस्थितीत, जाहिरातीत ते व्यंग्यात्मक पद्धतीने सादर करणे म्हणजे चाहते आणि संघ दोघांच्याही भावनांवर थट्टा करण्यासारखे आहे.
तथापि, जाहिरातीवर आरसीबीच्या कारवाईनंतर, आता सर्वांच्या नजरा उबर इंडियाच्या भूमिकेकडे लागल्या आहे. उबर ती जाहिरात मागे घेईल का? वा आपल्या बचावात काही युक्तिवाद सादर करेल का? हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, प्रत्येक सामन्यासोबत आयपीएलचा उत्साह वाढत आहे. आरसीबी देखील चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत हे प्रकरण समोर आल्यामुळे वातावरण तापले आहे.
तर माफीही मागावी लागणार
दरम्यान, आरसीबीच्या युक्तिवादाशी न्यायालय सहमत झाले तर उबर इंडियाला केवळ जाहिरातच काढून टाकावी लागणार नाही तर माफीही मागावी लागेल यात शंका नाही. दरम्यान, या प्रकरणात उबर इंडियाच्या उत्तरानंतर, सर्वांच्या नजरा दिल्ली उच्च न्यायालयाकडे असतील, अर्थात या प्रकरणात काय निर्णय घेतात.