---Advertisement---

पालकांनो, लक्ष द्या! सुट्यांमध्ये मुलं नातेवाईकांकडे जाताय? मग अशी घ्या काळजी

---Advertisement---

Child care tips : आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झालेल्या आहेत. सुटीचा आनंद घेण्यासाठी मुले-मुली नातेवाईकांकडे, शेजाऱ्यांकडे जात असतात. मात्र, अलीकडे मुला-मुलींच्या शोषणाच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः अल्पवयीन मुला-मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये जवळच्याच लोकांकडून अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अजाण मुलांना कुठेही पाठवताना ‘गुड टच, बँड टच’ याबाबत त्यांना कळेल, अशाप्रकारे समजावून सांगण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे पालक आपल्या पाल्यांची काळजी घेऊ शकतील, चला जाणून घेऊया काय आहेत या टिप्स.

अल्पवयीन मुला-मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यापैकी अधिक घटनांमध्ये जवळच्याच लोकांकडून अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरु झाल्या असून, आपल्या अजाण मुलांना कुठेही पाठवताना ‘गुड टच, बँड टच’ याबाबत त्यांना कळेल, अशाप्रकारे समजावून सांगण्याची गरज आहे.

तर निर्भयपणे बोलतील

तरच त्यांच्यासोबत घडणाऱ्या अनुचित प्रकारांची त्यांना जाणीव होईल आणि ही मुले आपल्या आई वडिलांकडे अशा प्रकारांबाबत निर्भयपणे बोलतील. त्यामुळे पालकांनी आपल्या अजाण मुलांना बाहेर पाठवताना काळजी घ्यायला हवी. आपलं मूल शारीरिक किंवा मानसिक शोषणाचे बळी ठरू नये, यासाठी पालकांनी त्यांना याबाबत कल्पना द्यायला हवी. तरच त्यांच्यासोबत चुकीचा किंवा वाईट प्रकार घडल्यास ते निर्भयपणे पालकांना सांगू शकतील.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

पालकांनी छोट्या मुलांसोबत काही चुकीचं घडलं तर सांगण्याचं धारिष्ट्य निर्माण करावं. त्यांना नात्यांविषयी कल्पना द्यावी. शक्यतो लहान मुले असतील तर त्यांना स्वतः सोबतच घेऊन जावे. मुलं आमिषाला बळी पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

अल्पवयीन मुला मुलींवरील अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढलेल्या दिसतात. मुलांना काहीतरी आमीष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याच्या घटना वाढत आहे. बऱ्याचदा जवळच्या नात्यातील व्यक्तींकडूनच अत्याचार केले गेल्याची घटना घडल्या आहेत.

त्यामुळे पालकांनी शक्यतो लहान बालकांना एकटे सोडू नये. बालकांना नातेवाईकांकडे पाठवल्यास सतत त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क करत राहावे. त्यातून काही गोष्टी समजू शकतील. बालकांशी सतत बोलले पाहिजे आणि त्यांच्याकडून जाणून घेतले पाहिजे.

गुड टच, बॅड टच याविषयी मुलांना माहिती द्या ?

आपली मुले बाहेर गेल्यानंतर ती कुठल्याही प्रकारच्या शोषणाला किंवा अत्याचाराला बळी पडू नयेत, यासाठी त्यांना ‘गुड टच, बॅड टच’ समजावून सांगायला हवेत. तरच त्या मुलांशी काही गैरप्रकार घडल्यास ती मुले पालकांना किंवा अगदी जवळच्या व्यक्तीला मोकळेपणाने सांगू शकतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment