---Advertisement---
Shindkheda News : मेथी शिंदखेडा येथील तालुका कृषी कार्यालयाचे पॉलीविनाइल क्लोराईड (PVC) ने तयार करण्यात आलेले छत कोसळल्याने कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे हाल होताना दिसून येत आहे.
मेथी शिंदखेडा येथील तालुका कृषी कार्यालयास एका वर्षांपूर्वी 2024 दरम्यान पीव्हीसी सिलिंग करण्यात आली होती. मात्र ती सिलिंग 17 एप्रिल 2025 रोजी पूर्णतः जमिनीवर कोसळली आहे. त्यासोबत पंखे सुद्धा पडले आहेत तर विजेचे तार (वायर) देखील विस्कळीत झाली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या खुर्चीवरच पंख्या सोबत सदर पीव्हीसी सिलिंग चे पीव्हीसी शीट पडले असल्याचे दिसून आले.
कार्यालयातील सिलिंग अचानक कोसळल्याने कार्यालयीन कामकाज करणे गैरसोयीचे झाले आहे. त्यात कार्यालयातील कागदपत्रे, दस्तावेज असलेली कपाटे, रॅकही मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत .
हे पडलेले छताचे मटेरियल येथील शिपाई कैलास कोळी यांनी कार्यालयाच्या बाहेर काढले .या छताची दुरुस्ती तात्काळ व्हावी कारण की तालुक्याचे कार्यालयाचे ठिकाण असल्याने शेतकरी राजांची वर्दळ जास्त असते.
जीवितहानी नाही
याविषयी कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर पीव्हीसी सिलिंग 2024 ला तात्कालीन कृषीअधिकारी शितल कुमार तवर यांच्या कार्यकाळात टाकण्यात आली होती.परंतु सिलिंग लावण्याचे काम व्यवस्थितपणे झाले नसेल यामुळेच सदर पीव्हीसी सिलिंग कोसळली आहे.यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.





