नंदुरबार : महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर प्रथमच त्याला उजळणी देण्याचे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात येणार आहे. मुक्ताईनगर येथून निघालेल्या मंगल कलश यात्रेचे 28 एप्रिल रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास सारंगखेडा येथे श्री एकमुखी दत्तच्या मंदिराजवळ आगमन होणार असून या ठिकाणी नंदुरबार जिल्हयातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जल्लोषात स्वागत करावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्त़र महाराष्ट्राचे संघटन प्रभारी तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा आढावा बैठकीत केले.
मदर टेरेसाच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत धुळे व जळगाव जिल्हयाचे पदाधिकारी तथा मंगल कलशाचे समन्व़यकांसह नंदुरबार जिल्हयातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पाटील, ज्येष्ठ़ किरण शिंदे,किरण पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, धुळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुमित पवार, नंदुरबारचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, मोहन शेवाळे आदी मान्य़वर व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील म्हणाले, महाराष्ट्र निर्मितीला 65 वर्ष झालीत. या राज्याच्या जडणघडणीत कुणाकुणाचा वाटा राहिला आहे,याची उजळणीच या निमित्ताने होणार आहे. 28 एप्रिल ला दुपारी 1.30 वाजेला सारंगखेडा येथे पोहचेल.त्यानंतर ही यात्रा येथून प्रकाशा येथे पोहचेल,त्यानंतर नंदुरबारच्या शिरीषकुमार मेहता स्मारकाजवळ यात्रा येईल. हया यात्रेचे सर्वच ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील तापी,गोमाई,पुलिंदा,नर्मदा व पाताळ गंगा या नदीचे पाणी गोळा करुन ते मंगलकलशात टाकण्यात येईल.तसेच या जिल्हयातील पवित्र स्थळावरील माती गोळा करुन ती मंगल कलशात एकत्र केली जाणार आहे.
मुंबईत सांस्कृतिक वा खाद्यसंस्कृतीचे आयोजन
दरम्यान, एक मे ते चार मे रोजी मुंबईत सांस्कृतिक वा खाद्यसंस्कृतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी नंदुरबार राष्ट्रवादी च्या महिला जिल्हाध्यक्षा सिमा सोनगरे, नंदूरबार तालुका अध्यक्ष मोंटू जैन, नवापूर तालुका अध्यक्ष् दिलीप आरजू गावित, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष रविंद्र वळवी, शहादा तालुका अध्यक्ष सुरेंद्र कुंवर, नंदुरबार महिला तालुका अध्यक्ष वैशाली चौधरी,धडगावचे रविंद्र पावरा,संजय खंडारे,मगन पुण्या ठाकरे आदींनी अहवाल सादर केला. तर अक्कलकुवा महिला तालुकाध्यक्षपदी रमिला राकेश पाडवी यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन मधूकर पाटील यांनी केले आभार मोहन शेवाळे यांनी मानले. यावेळी महिला जिल्हा कार्याध्यक्ष संगिता पाडवी,पुष्पा गावित यांच्यासह जिल्हयातील कार्यकर्तै मोठया संख्येने उपस्थित होते.