बेंगळुरू : येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आज आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना उशिरा सुरू होणार आहे. याचे कारण म्हणजे पाऊस. येथे पाऊस सुरु असून, सध्या तरी नाणेफेक आणि सामना केव्हा सुरु होईल हे सांगणे अवघड आहे.
आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्ज चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत ६-६ सामने खेळले आहेत. यात दोन्ही संघांनी ४-४ सामने जिंकले असून, २-२ सामने गमावले आहेत. या हंगामात आरसीबी आणि पंजाब दोघेही प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे दावेदार आहेत. तथापि, आज कोणता संघ अंतिम चारमध्ये पाऊल टाकतो हे पाहणे मनोरंजक असणार आहे.
बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम हे गोलंदाजांसाठी मानले जाते. आरसीबी आणि पंजाबमध्ये अनेक पॉवर हिटर फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत आज एक उच्च धावसंख्या असलेला सामना अपेक्षित आहे. या मैदानावर २०० चे लक्ष्य सहज साध्य करता येते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि यश दयाल
पंजाब किंग्जचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन – प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, जोश इंगलिस (यष्टीरक्षक) / मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग