---Advertisement---

Pachora : श्री.गो.से.हायस्कूल ठरली पाचोरा तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा

---Advertisement---

Pachora : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो.से.हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा म्हणून प्रथम क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक पटकावले असून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत पारितोषिक पटकावलेल्या विविध शाळांचा सत्कार सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी संकुल येथे संपन्न झाला.

माजी जि.प.सदस्य मधुकर काटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी गोकुळ बोरसे, गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, श्री.गो.से. हायस्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन खलील देशमुख यांचे सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर .एल.पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक आर .बी.तडवी, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर,सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिण्य, आर बी बांठीया, डीडी विसपुते,संगीता वाघ,पी.एम. पाटील,आर.बी. बोरसे, सुबोध कांतायन,अरुण कुमावत, डी.आर.टोणपे, सागर थोरात, रुपेश पाटील आदींनी सन्मानपत्र, ट्रॉफी आणि तीन लाख रुपयांचा चेक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

मुख्याध्यापक एन.आर.पाटील यांच्यावतीने शाळेतर्फे महेश कौंडिण्य यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जोशी आणि विनोद धनगर यांनी केले. शाळेने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड.महेश देशमुख,व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांचे सह सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ अभिनंदन केले असून सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत असून शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment