Varangaon News : ग्रामीण रुग्णालय ही ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने संजीवनी ठरतात. ही रुग्णालये आरोग्याचा कणा मानला जातो. मात्र, वरणगावात हा कणा मोडलगेल्याची स्थिती आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णाची हेळसांड होत आहे. अशात कल दि . १ ८ रोजी काही रुग्णांना गुड फ्रायडे म्हणून माघारी पाठविण्यात आले. रुग्णांना माघारी पाठवण्याचा हा प्रकार नित्याचा झाला असून वैद्यकीय सेवा बंद असल्याचं कारण दिल जात आहे.
आरोग्य सेवेच्या उडालेल्या या बोझवाऱ्याविषयी नागरिकांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली. या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष सुनील काळे व सहकाऱ्यांनी थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी असंख्य महिला ह्या आजारी असल्याने उपचारासाठी थेट पाऱ्यावर बसून होत्या. जोपर्यंत डॉक्टर येत नाही तो पर्यंत जाणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता.
हा सर्व प्रकार लक्ष्यात घेता नगराध्यक्ष सुनील काळे यांनी उपस्थित डॉक्टरांना धारेवर धरले. तसेच घडलेला सर्व प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या लक्ष्यात आणून दिला. ही संशय लक्षात घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी मंजूर असलेली 4 वैद्यकीय अधिकारी पदे त्वरित भरावी अशी मागणी केली. ही पदे जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पावित्रा सुनील काळे व कार्यकर्त्यांनी घेतला होता. या आंदोलनाची दाखल घेत प्रशासन त्वरित मंजूर रिक्त पदे भरणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.