Erandol : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागत्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. गेल्याअनेक दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस तापमानाची तीव्रता वाढत असून. मागील काही दिवसापासून उन्हाची चटके वाढताना दिसून येत आहे. याचाच परिणाम एरंडोल तालुक्यासह शहरात दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठ,चौक या मोक्याच्या ठिकाणी जथे नेहमी गर्दी असते तेथे देखील शुकशुकाट दिसून येत आहे.
सूर्याचा पारा चढल्यामुळे बाजारपेठेत व्यापारांची दुकाने तर उघडी दिसतात,परंतु ग्राहकांची रेलचेल मात्र दिसून येत नाही. तापमानामुळे नागरिक घराच्या बाहेर पडणे टाकतांना दिसून येत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळेस मुख्य बाजारपेठेसह सर्वेच रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसतात.
वाढते तापमान लक्षात घेता स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नागरिक छत्री चा आधार घेत आहेत. तर काही नागरिक तोंडाला रुमाल डोक्यावर टोपी घालून आपल्या दैनंदिन गरजेचे काम करताना दिसून येतात.
याचाच परिणाम बस स्थानकात देखील पहावयास मिळतो या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ कमी प्रमाणात आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते व ती पूर्ण करण्यासाठी नागरिक पारंपारिक शीतपेय मठ्ठा, लस्सी, लिंबू शरबत आदींचा स्वाद घेत असतात यामुळे शरीरातील पाण्याचे समतोल राहते. व उन्हापासून स्वतःचा बचाव होत असतो.