---Advertisement---

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु थोड्याच वेळात पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार!

---Advertisement---

PBKS vs RCB : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात थोड्याच वेळार सामना होणार आहे. मात्र, या सामन्यात पंजाब किंग्जच्या मालकिन प्रीति जिंटा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे प्रीति जिंटा आजारी पडल्या आहेत. दुसरीकडे आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्ज १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर बंगळुरू ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात कुणाचा वरचष्मा राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात आरसीबीची फलंदाजी सपशेल कोसळली. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्याच्या षटकांची मर्यादा २० वरुन १४ करण्यात आली व यात आरसीबीची धावसंख्या ९ बाद ९५ अशी झाली होती. एकट्या टिम डेव्हिडने एकाकी झुंज देत नाबाद ५० धावांची खेळी केली. फिल साल्ट, विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदार आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारखे फलंदाज आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर अपयशी ठरले. आता या सामन्यात तरी आरसीबीने आपली फलरंदाजीत सुधारणा करणे अपेक्षित आहे.

सुरुवातीला संघ स्थिर खेळत होता, परंतु फलंदाजी विभाग म्हणून आम्ही बरीच चांगली कामगिरी करू शकलो असतो. भागीदारी महत्त्वाची आहे, आम्ही जलद अंतराने फलंदाज गमावले व हा आमच्यासाठी एक मोठा धडा आहे, असे रजत पाटीदारने पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर म्हटले होते.

रविवारी आरसीबी धमाकेदार सुरुवात करण्यासाठी साल्ट आणि कोहलीवर अवलंबून असेल व मधल्या फळीत स्थिरता आणण्यासाठी पाटीदार, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, कृणाल पंड्या आणि डेव्हिड यांच्यावर जबाबदारी असेल. गोलंदाजीच्या आघाडीवर, जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार आक्रमणाचे नेतृत्व करतील परंतु त्यांना यश दयाल, कृणाल आणि सुयश शर्मा सारख्या खेळाडूंकडून खूप जास्त पाठिंबा आवश्यक असेल. सध्या आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्ज १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर बंगळुरू ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्ज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत आहे, परंतु गुणतालिकेत ते अव्वल स्थानावरील दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मागे आहे. पंजाबकडून अर्शदीप सिंग, झेव्हियर बार्टलेट व मार्को जॅनसेनने वगवान गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर लेग स्पिनर युझवेंद्र चहलने मधल्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरनेही चहलचे कौतुक केले आहे. तू सामना जिंकून देणारा आहेस व तुला शक्य तितके आम्हाला बळी टिपून देण्याची गरज आहे, असे अय्यरने चहलला म्हटले आहे.

पंजाबचा युवा फलंदाज प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्याकडून डावाला चांगली सुरुवात मिळण्याची अपेक्षा आहे. प्रियांशन आधीच शतक ठोकले होते. अय्यरच्या मदतीला जोश इंग्लिस, नेहल वधेरा, शशांक सिंग आणि मार्कस स्टोइनिससारख्या मजबूत मधल्या फळीचा अभिमान आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment