---Advertisement---

“व्हिडिओ मिळेपर्यंत कदाचित मी या जगात नसेल…” पत्नीच्या जाचाला कंटाळून इंजिनियर पतीने उचलले टोकाचे पाऊल

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून पतिपत्नीच्या वादातून हत्या आणि आत्महत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिसांपूर्वीच मेरठ येथे एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली होती. हि घटना ताजी असतांनाच मेरठ मध्येच पुन्हा एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची गळा आवळून हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून पतीला साप चावल्याचा बनाव त्यांनी केला. परंतु शवविच्छेदन अहवालात त्यांचा पर्दाफाश झाला.

या दोन्ही घटना चर्चेत असतांनाच, पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक विडिओ देखील बनवला होता. ज्यात तो पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं बोलतांना दिसत आहे.बनवलेला व्हिडीओ त्याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला लावून एका खोलीत गळफास घेऊन आत्मह्त्या केली. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

मोहित यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहित हा एका एका सिमेंट कंपनीत फील्ड इंजिनिअर म्हणून नोकरीला होता. त्याचे,पत्नी प्रिया यादवशी सात वर्ष प्रेमसंध होते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने दोघाचे लग्न देखील झाले. लग्नानंतर आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालले होते. मात्र, दरम्यानच्या काळात प्रियाची बिहारमधील समस्तीपूरमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली.

शिक्षिका म्हणून निवड झाल्यानंतर प्रियाने अचानक तिच्या वागण्यात बदल करण्यास सुरुवात केली. प्रिया तिच्या आई आणि भावाच्या सांगण्यावरून पती मोहितला त्रास देऊ लागली. तिने घर आणि जमीन तिच्या नावावर करण्यासाठी मोहितवर दबाव आणण्यास सुरुवात केली. यामुळे, अस्वस्थ झालेल्या मोहित यादवने पुण्याला जात असल्याचं सांगून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने इटावा येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

मोहितने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “तुम्हाला हा व्हिडिओ मिळेपर्यंत कदाचित मी या जगात नसेल. जर मुलांसाठी कायदा असता तर मी हे चुकीचे पाऊल उचलले नसते. माझ्या पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक छळ मी सहन करू शकलो नाही. म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे. पप्पा मम्मी कृपया मला माफ करा. माझी पत्नी प्रिया यादवच्या आईने माझ्या मुलाचा गर्भपात केला. माझी पत्नी मला धमकी देत ​​आहे की जर घर आणि मालमत्ता माझ्या नावावर केली नाही तर ती मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या हुंड्याच्या आरोपात अडकवेल.म्हणून मी मानसिक छळाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे, जर माझ्या मृत्यूनंतरही मला न्याय मिळाला नाही तर माझी राख नाल्यात फेकून द्यावी.पप्पा मम्मी , तुम्ही सर्वांनी मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.अभय नाथ त्रिपाठी, एसपी सिटी, यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हॉटेलमधून याप्रकरणाची माहिती मिळाली होती. मोहित या हॉटेलमध्ये आला. त्यानंतर त्याने रुम बुक केला. रूम मध्ये गेल्या नंतर मोहित हा बराच वेळ बाहेर न असल्याने रूमचा दरवाजा तोडून पहिला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याबाबत मोहितच्या कुटुंबियांना कळविण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment