---Advertisement---

नंदुरबार जिल्ह्यात ‘एप्रिल हीट’चा तडाखा ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी महावितरणकडून ‘कूलर’चा वापर

---Advertisement---

धडगाव : नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या उष्णतेने कहर केला असून, तापमानाचा पारा थेट ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या तीव्र उकाड्याचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे, तर वीज यंत्रणेवरही होताना दिसत आहे. धडगाव व परिसरात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवर उष्णतेचा मोठा ताण येत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.

या समस्येवर तोडगा म्हणून महावितरणकडून आता ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी चक्क कूलरचा वापर करण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जात असली, तरी यंदाच्या तीव्र उन्हामुळे ही गरज आणखीनच वाढली आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उन्हापासून बचावासाठी घराबाहेर निघताना डोके झाकणे, पाणी भरपूर पिणे आणि शक्यतो दुपारी बाहेर न पडणे यासारख्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. उष्णतेचा प्रकोप वाढत असताना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे हे ‘कूल’ उपाय चर्चेचा विषय ठरत आहेत.

‘तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेल्याने ट्रान्सफॉर्मर अधिक गरम होतात आणि त्यामुळे ते ट्रिप होण्याची शक्यता वाढते. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. त्यावर उपाय म्हणून ट्रान्सफॉर्मरला कुलर लावण्यात आले आहेत आणि त्याच्या साहाय्याने त्यांना थंड ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.’

जगदीश पावरा, कार्यकारी अभियंता धडगाव, महावितरण

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment