---Advertisement---

शिंदखेडा भाजपा शहराध्यक्षपदी संजयकुमार महाजन यांची वर्णी

---Advertisement---

शिंदखेडा : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती घेतले आहे. या संघटन पर्वाचा आढावा बैठकीत तरुणांना अधिकाधिक संधी मिळावी असा प्रयत्न राहणार आहे.संघटन पर्वाअंतर्गत भाजपचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी लक्ष्य साध्य करून महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले आहे.

भाजपमध्ये लोकशाही पद्धत राबवून संपुर्ण निवड प्रक्रिया होत असते.भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक बदलांना सुरुवात केली आहे.गटनेते अनिल वानखेडे यांचे विश्वासू व उच्चविद्या विभुषित कुटुंबातील अध्यापक, पत्रकार व सामाजिक कामात रस असणारे व पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करणारे भडणे येथील सी बी देसले विद्यालयाचे अध्यापक संजयकुमार उमेशचंद्र महाजन यांची शिंदखेडा शहराच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले व भाजप विचारसरणीचा प्रभाव असणारे तसेच कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक सच्चा कार्यकर्ता संजयकुमार महाजन यांना ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनान्वये दि २० रविवारी दोंडाईचा येथील जय पॅलेस येथील कार्यक्रमात करण्यात आली आहे.

आपल्या मनोगतात मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, ते शिंदखेडा शहरासाठी एक उच्चशिक्षित सच्च्या कार्यकर्त्याकडे अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. संजयकुमार महाजन या पदास न्याय देऊन पक्ष संघटन मजबूत करतील व सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान मोदीजींचे विचार समाजात रुजवतील यांत कोणतीही शंका नाही.

या निवडी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी नारायण चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, दोंडाईचा बाजार समिती कृषी सभापती नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, डी एस गिरासे,माजी शहराध्यक्ष अँड विनोद, पाटील,माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, प्रकाश देसले,यु्वराज माळी, सुभाष माळी,ज्येष्ठ मार्गदर्शक दयाराम माळी, दीपक चौधरी,चेतन परमार,उदय देसले, सुरज देसले, उल्हास देशमुख, सुभाष माळी, मिलिंद पाटोळे, कुणाल माळी, वीरेंद्र वाडिले, गुलाब सोनवणे आदी उपस्थिती होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment