---Advertisement---

Amarnath Yatra 2025 : यंदा ‘या’ तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, अशी असेल नोंदणी प्रक्रिया

---Advertisement---

नवी दिल्ली : यंदा अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून सुरुवात होणार असून ९ ऑगस्टला संपणार आहे. अमरनाथ यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात सुरू होते. सावन पौर्णिमेला संपते. अमरनाथ धामच्या यात्रेला धार्मिक महत्त्व आहे. तसेच ही यात्रा करणे पुण्याचे मानले जाते. या यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व ज्यांना माहिती आहे त्यांना एकदा ही यात्रा करण्याची इच्छा असते. ६२ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी १४ एप्रिलपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. Amarnath Yatra 2025

यात्रेकरू श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणी करू शकतात. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या संपूर्ण भारतात ५४० पेक्षा अधिक बँक शाखा आहेत. येथून नोंदणी करू शकतात. जर यात्रेकरूंना ऑफलाइन नोंदणी करायची असेल तर ते नोंदणी केंद्र किंवा बँक शाखेत जाऊ शकतात.

सहसा, यात्रेच्या निवडलेल्या दिवसाच्या तीन दिवस आधी वैष्णवी धाम, पंचायत भवन आणि महाजन हॉलसारख्या ठिकाणी टोकन स्लिप्स वाटल्या जातात. यात्रेकरूंनी दुसऱ्या दिवशी अधिकृत नोंदणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी सरस्वती धामला जावे. यात्रेकरूंना जम्मूमधील विशिष्ट ठिकाणांहन त्यांचे आरएफआयडी कार्ड घ्यावे लागतील.

अशी करा ऑनलाईन नोंदणी

श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा ऑनलाइन सेवा या पर्यायावर क्लिक करा. ड्रॉपडाउन मेनूमधील ट्रॅव्हल परमिट वेबसाइटवर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, अटींशी सहमत व्हा आणि नोंदणीसाठी पुढे जा. तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि तुमच्या प्रवासाची तारीख, वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा. तुमच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोची आणि आरोग्य प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर आलेला ओटीपी देऊन तुमचा मोबाईल पडताळून घ्या. २२० रुपये नोंदणी शुल्क भरा. पेमेंट झाल्यानंतर, तुम्ही पोर्टलवरून तुमचा प्रवास नोंदणी परवाना डाउनलोड करू शकता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment