---Advertisement---

IPL 2025 :  लखनौ सुपर जायंट्स आज दिल्लीला लोळवणार?

---Advertisement---

लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमिर लीग (IPL 2025) हंगामात मंगळवारी येथे दिल्ली कॅपिटल्स वि. लखनौ सुपर जायण्ट्स यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या लखनौ सुपर जायण्ट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या सलामीवीरांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

सध्या गुजरात १२ आणि दिल्ली, बंगळुरू, पंजाब व लखनौ या चार संघांचे प्रत्येकी १० गुण असून सरस धावगतीच्या आधारे ते अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकात आहे. एकीकडे दिल्लीला आपले अव्वल चार क्रमांकातील स्थान मजबूत करायचे आहे, तर दुसरीकडे लखनौ अव्वल चार क्रमांकात स्थान मिळवण्यास उत्सुक आहे.

या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात थोडीशी रंजक राहिली आहे. फाफ डु प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल व नवीनतम प्रवेश करणारा करुण नायर अव्वल फळीत फलंदाजीसाठी येत आहेत. गत पाच सामन्यांमध्ये या चार फलंदाजांमध्ये तीन वेगवेगळ्या सलामीवीरांची जोडी होती, यात त्यांची २३. ३४ ०, ९, ० अशी भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसच्या दुखापतीमुळेही हे घडले. या सामन्यापूर्वी डु प्लेसिसच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. दिल्ल कॅपिटल्सने आतापर्यंक आपल्या सातपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील मधल्या फळीनेही चांगली कामगिरी केली आहे.

पण लखनौच्या दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, आवेश खान व शार्दुल ठाकूर या सक्षम गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजविले आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध लखनौ संघाच्या दोन धावांनी झालेल्या विजयात आवेशने १८ व्या व २० व्या षटकांत ज्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी केली, हे त्याचे एक उदाहरण आहे. त्यामुळे लखनौ संघाचा आत्मविश्वासी दुप्पट असेल व ते कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू शकतात. दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनाला सलामी जोडीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे, जेणेकरून मधल्या फळीतील फलंदाजांवर अधिकाधिक धावा काढण्याचे दडपण येणार नाही, याची खात्री करायला पाहिजे. लखनौ संघाकडून मिचेल मार्श, निकोलस पूरन व एडन मार्करामने अनेकदा उत्तम कामगिरी केली आहे.

कर्णधार पंत, अक्षर यांचे कष्ट

कर्णधार ऋषभ पंतचा फॉर्म लखनौ संघासाठी एक मोठी समस्या आहे. पंतने आठ सामन्यांत १०६ धावा केल्या आहेत व त्यापैकी ६३ धावा एकाच सामन्यातून आल्या आहेत. दिल्लीविरुद्ध खेळताना पंतला मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, विप्रज निगम व मुकेश कुमार यांच्यासारख्या उत्कृष्ट गोलंदाजांचा सामना करावा लागेल. पण लखनौ प्रमाणेच, दिल्ली कॅपिटल्स संघाला सुद्धा त्यांचा कर्णधार अक्षर पटेलबद्दल काही चिंता असतील. अक्षरने चांगले नेतृत्व केले आहे आणि १५९ च्या स्ट्राईक रेटने १४० धावा केल्या आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment