Stock Market: आज भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. आज बाजार बंद होतांना सेन्सेक्स 187 अंकांनी वाढून 79,595.59 वर बंद झाला. तर निफ्टी 41 अंकांनी वाढून 24,167 वर बंद झाला. बँक निफ्टी 342 अंकांनी वाढून 55,647 वर बंद झाला. आज मिडकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली.
कोणते शेअर्स वधारले ?
ITC,HUL, M&M, HDFC Bank, Eternal,
कोणते शेअर्स घसरले ?
IndusInd Bank, Power Grid, Infosys, Bharti Airtel, Bajaj Finserve

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.39 लाख कोटींची वाढ
आज २२ एप्रिल रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल427.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यापार दिवशी म्हणजेच सोमवार 21 एप्रिल रोजी 425.85 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 1.39 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.39लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.