TerroristAttack In Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे आतंकवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले, ज्यामध्ये सात जण जखमी झाले असून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. सीआरपीएफची अतिरिक्त क्विक रिअॅक्शन टीम (क्यूएटी) घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.
पहलगामच्या बैसरन येथे आतंकवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये काही घोड्यांनासुद्धा गोळ्या लागल्या आहेत. महिला पर्यटकाने काश्मीर पोलिसांना कॉल करून माहिती दिली. दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून महिलेच्या पतीच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. यात पर्यटकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पहलगाममधील आतंकवादी हल्ला ही एक चिंताजनक बातमी आहे. . लवकरच अमरनाथ यात्रा सुरू होणार असून त्याचा बेस कँप पहलगाममध्ये आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधी झालेल्या या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.