---Advertisement---

Pahalgam Terror Attack: सप्तपदीचे स्वप्न अधुरेच… स्वित्झर्लंडला जायचे होते, पण व्हिसामुळे निर्णय बदलला अन् सर्वच संपलं

---Advertisement---

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी दहशतवाद्यांकडून नाव आणि धर्म विचारण्यात आला. मुस्लिम नसल्याचं समजताच त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये नौदल लष्करातील एका २६ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. टीआरएफ या स्थानिक अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाने परिसराला घेरले असून, अतिरेक्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

नौदलातील २६ वर्षीय अधिकारी विनय नरवाल आणि हिमांशी यांचे १६ एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये लग्न झाले आणि त्यानंतर १९ एप्रिल रोजी रिसेप्शन आयोजित करण्यात आले. लग्नानंतर दोघांनीही हनिमूनसाठी त्यांना स्वित्झर्लंडला जायचे होते पण व्हिसा मिळाला नाही, म्हणून त्यांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी विनय नरवालला त्याचे नाव विचारले होते आणि नंतर ते हिंदू असल्याचे कळल्यानंतर त्यांच्यावर पत्नीसमोरच गोळ्या झाडण्यात आल्या.दहशतवाद्यांनी केलेल्या या टार्गेट किलिंगमुळे संपूर्ण देशात आणि जगात संताप आहे.

पहलगाम की यह तस्वीर नहीं भूलेगा देश! नेवी अफसर के शव के पास रोती रही दुल्हन, गए थे हनीमून पर

पहलगाम हल्ल्यानंतर एका मृतदेहा शेजारी बसलेल्या तरुण नवविवाहितेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हातावर मेहंदी, हातात चुडा असलेली नवविवाहिता पतीच्या मृतदेहाशेजारी हतबल होऊन बसलीय. मन हेलावणारं हे दृश्य आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment