---Advertisement---

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचे फोटो आले समोर

Pahalgam Terror Attack
---Advertisement---

Pahalgam Terror Attack: काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यात २७ नागरिक ठार, तर २० जखमी झाले. मृतकांमध्यो दोन विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. टीआरएफ या स्थानिक अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यामागील तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू ताल्हा अशी या तिन्ही दहशतवाद्यांची नावे पुढे आली आहेत.

NIAचे पथक पहलगामधील घटनास्थळी दाखल

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक आज (दि.२३) दाखल झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले असून, ते पथक जम्मू-काश्मीर पोलिसांना तपासात मदत करेल, असेही वृत्तात म्हटले आहे

गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बैसरन व्हॅलीला पोहोचले. येथे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात देखील गृहमंत्री अमित शाह यांनी भेट दिली. अमित शाह हे कालपासून श्रीनगरमध्ये आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक देखील घेतली. जखमी रुग्णांना रुग्णालयात जाऊन भेटले. बैसरन खोऱ्यात अमित शाह यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment