Pakistani YouTube Channels Ban: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हालयात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भ्याड हल्ल्याविरुद्ध संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्शवभूमीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोळा पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सवर भारतात बंदी घातली आहे.या चॅनेलमध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज सारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे.
पाकिस्तानविरुद्ध हे नवीनतम पाऊल गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून उचलण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी युट्यूब चॅनेल भारत, त्याचे सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध भडकाऊ आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती प्रसारित करत होते. त्यामुळे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोळा पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सवर भारतात बंदी घातली आहे
या चॅनेल्सवर घेतली बंदी
Basit Ali (@BasitAliShow)
Shoaib Akhtar (@ShoaibAkhtar100mph)
Muhammad Furqan Bhatti (@Furqan.Bhatti)
BBN SPORTS (@BBNSPORT)
Sana Amjad (@SanaAmjad)
Arzoo Kazmi (@ArzuKazmi)
Caught Behind (@CaughtBehindShow)
Sawera Pasha (@SaweraPasha1)
CBA – Arsalan Naseer (@arsalancba)
Rizwan Haider (@RizwanHaider1)
Wasay Habib (@WasayHabib)
Tanveer Says (@TanveerSays)
Aap ka Mohsin Ali (@AapkaMohsinAli)
Raftar Now (@RaftarNow)
GNN (@gnnhdofficial)
Umar Cheema Exclusive (@UmarCheemaExclusive)
Asma Shirazi (@AsmaShiraziofficial)
Muneeb Farooq (@muneebfarooqofficial)
SUNO News HD (@SUNONewsHD)
Sports Central by DRM (@SportsCentralOfficial)
A Sports (@ASportspk)
Hasna Mana Hai (@GeoHasnaManaHa)
How Does It Work Podcast (@hdiwpodcast)
ARY News (@ArynewsTvofficial)
Dawn News (@dawnnewspakistan)
BOL News (@BOLNewsofficial)
SAMAA TV (@Samaatv)
Samaa Sports (@SamaaSports)
Geo News (@geonews)
GEO SUPER (@GeoSuper)
Syed Muzammil Official (@syedmuzammilofficial7067)
Muzammil Speaks (@muzammilspeaks)
The Pakistan Reference (@ThePakistanExperience)
Raftar Sports (@raftarsports)
Uzair Cricket (@UzairCricket786)
Raftar (@raftartv)
भारताचे पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत, भारताने सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारताने सिंधू पाणी करार सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सरकारने सार्क अंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व व्हिसा सवलती रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे. याशिवाय, भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे.
केंद्र सरकारने पाकिस्तानी राजदूतांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयासोबतच, अटारी सीमा चेकपोस्ट देखील बंद केली जाईल, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील जमीनी संपर्क देखील संपेल. हे सर्व निर्णय भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत स्थिरता लक्षात घेऊन घेण्यात आले आहेत.