---Advertisement---

Stock Market Closing: शेअर बाजार सुसाट;सेन्सेक्स 1005 अंकांनी वधारला, FII कडून खरेदी

---Advertisement---

Stock Market Closing: भारतीय शेअर बाजार आज (२८ एप्रिल) रोजी मोठ्या वाढीसह बंद झाला आहे. आजच्या व्यवहारांती बीएसई सेन्सेक्स १००५.८४ अंकांच्या मोठ्या वाढीसह ८०,२१८.३७ वर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी २८९.१५ अंकांच्या वाढीसह २४,३२८.५० वर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी वाढ झाली आहे. यासोबतच बीएसईवर ४,१७९ शेअर्सचे व्यवहार झाले. त्यापैकी १,९५८ शेअर्स वाढीसह बंद झाले तर २,०३८ शेअर्समध्ये घसरण झाली.

कोणते शेअर्स वधारले ?

सनफार्मा शेअर (2.97%), टाटा स्टील शेअर (2.42%), एसबीआय शेअर (2.36%), एम अँड एम शेअर (2.29%), अ‍ॅक्सिस बँक शेअर (2.21%), डॉक शेअर (5.54%), गोडिजिट शेअर (5.18%), आरबीएल बँक शेअर (10.25%), डीसीबी बँक शेअर (9.68%), पारस डिफेन्स शेअर (9.31%) 

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ४,५१,८६०.१९ कोटी रुपयांनी वाढून ४२६.१० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. २५ एप्रिल रोजी ते ४२१.५९ लाख कोटी रुपये होते.

FII कडून खरेदी

गेल्या आठ दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी (FII ) केलेली सततची खरेदी हे बाजाराच्या तेजीला कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक आहे. एफआयआयनी त्यांची सतत विक्रीची रणनीती बदलली आहे आणि आता खरेदी करत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment