---Advertisement---

‘क्रांतीपर्व’ स्मारकाचे आमदार अनिल पाटलांच्या हस्ते लोकार्पण

---Advertisement---

अमळनेर : स्वातंत्र्याच्या लढ्याची उजळणी करण्यासाठी डॉ. उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांच्या स्मारकाची अमळनेरात आवश्यकता होती. त्यांचे धाडस ,लढा, स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न काळाच्या पडद्याआड चालले होते. १ मे रोजी लीलाताई यांची पुण्यतिथी असल्याने हे स्मारक नगरसेवक , डांगरी ग्रामस्थ आणि नागरिकांच्या आग्रहाखातर लोकांसाठी खुले करण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मधील ‘क्रांतीपर्व’ स्मारकाच्या अधिकृत लोकार्पण प्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर बाजार समिती सभापती अशोक पाटील, मुख्याधिकारी तुषार नेरकर , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील ,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील , पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे , माजी नगरसेविका ऍड चेतना पाटील , माजी नगरसेविका गायत्री दीपक पाटील , माजी नगरसेवक राजू फापोरेकर , विवेक पाटील हजर होते.

महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ७७ लाख रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले होते. मराठा सेवा संघाच्या मागणीनुसार माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता. स्मारक अनेक दिवसांपासून झाकलेले होते. नुकतेच संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे स्मारक खुले करण्यात आले होते. त्यांनतर श्याम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा झाकले होते. यावर बोलताना अनिल पाटील म्हणाले की उदघाटनाबाबत वेगवेगळे स्वरूप यायला लागले होते. आपण कार्य करून त्याला कर्तृत्वाची जोड लावायची असते. काम करा आणि विसरा ही भूमिका आपण घेत नाही तोपर्यंत श्रेय वाद डोक्यातून जात नाही. आपण लोकांप्रति कार्य करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही.

सुरुवातीला पहेलगाम हल्ल्यातील ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आमदार पाटील पुढे म्हणाले की देशासाठी लढलेल्या क्रांतिकारक ,स्वातंत्र्यसैनिक , सैनिक यांच्या समरणार्थ २७ पासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर मंगल कलश नेणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मंगल कलश यात्रेचे नेतृत्व माझ्याकडे असल्याने मुक्ताईनगर येथून सुरू होणार आहे. बोरी ,तापी नदीचे जल आणि जेथे चिमठाण्याला डॉ उत्तमराव पाटील यांचा खजिना लुटला होता तेथील माती या कलशात न्यायची आहे. त्यादृष्टीने आणि १ मे रोजी लीलाताई यांची पुण्यतिथी असल्याने या स्मारकाचे लोकार्पण करणे गरजेचे होते.

या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील ,प्रा सुरेश पाटील , कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी , शहराध्यक्ष मनोज पाटील , संदीप घोरपडे बन्सीलाल भागवत , पराग पाटील ,विनोद कदम , प्रा मंदाकिनी भामरे , माजी प स सदस्य जयश्री पाटील , जे के पाटील , प्रताप शिंपी , नरेंद्र संदानशीव , राजेश पाटील हजर , हिरालाल पाटील ,दीपक पाटील ,बी एस पाटील हजर होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment