---Advertisement---

उंडाई देवीची यात्रा उत्सवात संपन्न, ग्रामस्थांनी आमदार राम भदाणे यांचा फेडला नवस 

---Advertisement---

धुळे : तालुक्यातील उडाणे येथील उंडाई देवीची यात्रा उत्सवात साजरी करण्यात आली. आमदार राघवेंद्र (राम भदाणे) भदाणे यांचा विजयाचा नवस यावेळी ग्रामस्थांकडून फेडण्यात आला. धुळे तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती तथा नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी देवीची ओटी भरूण आशीर्वाद घेतला. 

उडाणे गावाचे ग्रामदैवत आई उंडाई देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षी रविवारी उत्सवात साजरी करण्यात आली. गावातील प्रगतशील शेतकरी कै. महादु नामदेव हालोर, डिगंबर सहादु शिंदे, कृष्णाजी नामदेव बागुल व स्व सुरेशपुरी शंकर गोसावी यांनी उंडाई देवीची यात्रा भरवण्याची सुरवात केली होती. गावातील लोकांनी लोकवर्गणीतून यात्रा उत्साह सुरु ठेवला आहे. मागील दोन-तीन वर्ष यात्रा बंद पडल्यानंतर गावातील तरुण मित्रांनी या ठिकाणी उंडाई देवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकवर्गणीतून यात्रा पुन्हा सुरू केली. गावातील ग्रामपंचायत सदस्य भटू बागुल यांनी आमदार राम भदाणे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी नवस केला होता. नवस फेडण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे यांच्या मातोश्री धुळे तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती तथा नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे हे देखील उपस्थित होत्या.  

सरपंच ज्ञानज्योती भदाणेयांनी उंडाई मातेची ओटी भरून साडी चोळीचा आहेर चढवला. यावेळी गावातील माजी सरपंच विठ्ठल बागुल, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान शिंदे, रघुनाथ पाटील, शामराव बागुल, लेबर ऑफिसर नवल पाटील, नानाभाऊ वाघ, उपाध्यक्ष धुळे जिल्हा धनगर समाज महासंघ मल्हार सेना सुभाष शिंदे, संदीप पैलवान, जितेंद्र शिंदे, सोनू शिंदे, किशोर हाके, भूषण शिंदे, वकिल हाके, समाधान बागुल, शशिकांत शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment