---Advertisement---

Pahalgam Terror Attack : ‘व्होट जिहादसाठी पीडितांना खोटं ठरवू नका’, मंत्री गिरीश महाजनांचा शरद पवारांवर हल्लाबोल

---Advertisement---

Girish Mahajan on Sharad Pawar : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारला याबाबत माहिती नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले असून, भाजप नेत्यांकडून पवारांच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहे. अशात ‘व्होट जिहादसाठी पीडितांना खोटं ठरवू नका’, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे बैसरन खोऱ्यात अद्याप भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात सुमारे २८ भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. विशेषतः हा हल्ला दहशतवाद्यांनी धर्म विचारून केला, त्यांनी हिंदू पर्यटकांवर गोळ्या घातल्याचे काही पर्यटकांनी सांगितले.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारला याबाबत माहिती नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले असून, भाजप नेत्यांकडून पवारांच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहे. अशात ‘व्होट जिहादसाठी पीडितांना खोटं ठरवू नका’, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन?

“व्होट जिहाद” साठी मृत्युची थट्टा ?
पवार साहेब… तुम्हाला इतरांचं दुःख जाणवत नसेल तरी ठीक आहे, पण आपल्या “व्होट जिहाद” साठी इतरांच्या दुःखाला खोटं ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पहलगाम येथे झालेला रक्तपात हा केवळ दहशतवादी हल्ला नाही.. या हल्ल्यात पुरुषांना मारून महिलांना आयुष्यभर मरणयातना भोगण्यासाठी जिवंत ठेवण्यात आलं. केवळ हिंदूंना टिपून, धर्म विचारून केलेला हा धार्मिक नरसंहार आहे. ज्यांनी डोळ्यादेखत आपला मुलगा गमावला, भाऊ गमावला, पती गमावला, बाप गमावला ते प्रत्यक्षदर्शी सांगताय काय अतिरेक्यांनी धर्म विचारून जीव घेतला. अन् तुम्ही हजारो मैल दूर बसून त्या सर्वांना खोटं ठरवताय ? “दहशतवाद्यांनी कोणाला धर्म विचारला नाही” हे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने सांगताय काय जणूकाही ते दहशतवादी तुम्हालाच विचारून सगळं करत होते..!
आपलं वय पाहता आपला अपमान न करणे हे संस्कारांनी आमच्यावर घातलेलं बंधन आहे, अन्यथा आपल्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे आहेत!

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment