---Advertisement---

पाकिस्तानचे काय होणार? पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिली पूर्ण मुभा

---Advertisement---

नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कधीही न विसरता येणारा धडा शिकवण्यात यावा, असा दवाब देशभरातून सरकारवर वाढत असताना पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याच्या निर्णयाप्रत भारत आला आहे.

पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्णपणे मुभा दिली आहे. आमचा तिन्ही सेनादलांवर पूर्ण विश्वास आहे. पाकिस्तानविरोधात कारवाईची पद्धत, वेळ, ठिकाण आणि लक्ष्य सेनादलांनी ठरवावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या काही दिवसात सरकार पाकिस्तानविरुध्द कठोर लष्करी कारवाई करणार असे संकेत मिळू लागले आहे.

मंगळवारी मोदी यांच्या ७ लोककल्याण मार्ग या अधिकृत शासकीय निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वापदलप्रमुख एअर चीफ मार्शल अमखीतसिंग तसेच नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते.

काश्मिरातील ४८ पर्यटनस्थळे बंद

श्रीनगर : सुरक्षेचे उपाय म्हणून जम्मू-काश्मिरातील ८७ पैकी ४८ पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांवर आणखी हल्ले होण्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आणखी काही ठिकाणांचा समावेश होऊ शकतो, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. बंद केलेल्या स्थळांमध्ये मुख्य शहरांपासून दूर आणि गेल्या दहा वर्षांत सुरू झालेल्या नव्या ठिकाणांचा समावेश आहे.

यासंदर्भात अधिकृत आदेश देण्यात आले नसले तरी ४८ ठिकाणी पर्यटकांचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. तसेच दूशपथरी, कोकेरनाग, दुश्कुम, सिंथन टॉप, अच्चवाल, बांनगुस खोरे, मार्गन टॉप आणि तोसमैदान या पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment