पाचोरा : खंडणीसाठी अपहरण केलेल्या इसमाची १२ तासांत सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेत, चाळीसगांव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अनिल गणेश राठोड (रा. वाघले ता. चाळीसगांव जि. जळगांव) यांचे वडील गणेश ताराचंद राठोड (वय ४२ रा. बाघले) यांना ३० रोजी अनोळखींनी अपहरण केले. त्यांच्या सुटकेसाठी ४५ लाखांची खंडणी मागत असल्याची फिर्याद अनिल राठोड दिली होती. त्यानुसार चाळीसगांव ग्रामीण पोस्टे येथे गुर १३७/२०२५ मान्य होता कलम १४०(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी हे अपहरण केलेल्या व्यक्तीस मारहाण कराचे छोडोमो टाकून तसेच कईस कॉल करून पैसे तात्काळ देण्याची धमकी देत होते. यातील अपहरण केलेला इसम याचे नक्की कोठून अपहरण झाले आहे. गावात काहीही पुरावा मिळुन येत नव्हता. गुन्हयाने गांभीर्य पाहून तो उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानीक गुन्हे शाखा पथकास सूचित केले होते.
त्यानुसार नमूद गुरुषाच्या समांतर तासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून नेमण्यात आलेल्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे जपेदा शिंदे, वय.२८. निळी २) श्रावण पुंडलिकभागोरे, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव नाशिक यांची नावे निकेल त्यांचे वठिकाणाचा माहीती घेतली असता ते मोजे मोझ तानांदगाव परिसरात असल्यचे आता बातमी मिळाली. तेव्हा पथकाकडून त्यांचा शोध घेत असताना आरोपी हे मनमाड रेल्वेस्टेशनकडे मोटार सायकलवरुन जात असल्याची माहीती मिळाली.
आरोपींच्या मोटार सायकलचा पाठलाग करत असताना पोलीस गाडी पाहुन सदर आरोपी हे मोटार सायकल रस्त्यावर सोडुन रस्त्यालगतच्या शेतामधुन पळुन जाता दिसले. सदर आरोपी यांचा सुमारे ५ किलोमिटर पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले. ताब्यात घेवुनत्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आमचे मित्र जनार्दन बाळु आवारे उर्फ राजु पाटील रा शिंदी ता चाळीसगांव ह.मु. जि. ठाणे व त्याचा मित्र सोनू भाऊ पूर्ण नाव माहित नाही रा. मुंबई यांच्या सांगण्यावरून आम्ही गणेश ताराचंदराठोड यांचे अपहरण केले होते व त्यांना मारहाण करुन त्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ त्यांच्याच मोबाईलफोनवरुन त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवित होतो व गणेश ताराचंद राठोड याला सोडण्यासाठी त्याच्या मुलाकडे ४५ लाख रुपयांची खंडणी मागीतली होती, अपहरण केलेल्या गणेश ताराचंद राठोड यांना गांव तालुपातील पाटणा गावाचे परिसरात एका शेतीमध्ये डांबून ठेवून त्यांना मारहाण केली अशी हकिगत आरोपी यांनी सांगीतली. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपी यांनी अपहरण केलेल्या पिडीत व्यक्तीला विंचुर लासलगाव येथील जंगलात सोडुन देवुन उर्वरित दोन
आरोपी हे तेथून फरार झाले. त्यांना पथकाने सदर पिडीत व्यक्तीचा लासलगांव जंगलामध्ये शोध घेतला असता जखमी अवस्थेत डित गणेश ताराचंद राठोड हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून दोन आरोपीसह त्यांना चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,, स्वागु लगाउन खोजे संदीप पाटील, पेहलोत को महेश पाटील, पोकों सागर पाटील, पोकॉ भूषण शेलार, पोकों ईश्वर पाटील, पोकों भुषण पाटील, पोकों जितेंद्र पाटील, चापोह दिपक चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पथकाने केली आहे.