NEET Exam : राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय येथे उद्या रविवार ४ मे रोजी NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, परीक्षेस येणाऱ्या वाहनांची गर्दी त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राकडे जाणारा रस्ता हा अत्यंत अरुंद असल्याने बाजाराची गर्दी तसेच परीक्षार्थीची गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणे यासाठी उशीर होऊ शकतो.
त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव यांचेकडील मुंबई मार्केट अँड फेअर्स अॅक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) च्या आदेशान्वये पारोळा शहरातील दि:04/05/2025 रोजी भरणारा आठवडे बाजार रद्द करून सदरचा आठवडे बाजार सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा असे आदेशित करण्यात आले आहे.
यानुसार पारोळा शहरातील आठवडे बाजार हा सोमवार दि: 05 मे रोजी भरविण्यात येईल. याची सर्व व्यापारी, अडते, दुकानदार तसेच शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व होणारी गैरसोय टाळावी. सदर परीक्षा ही इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय व अभियांत्रिकी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
NEET Exam: पारोळ्यात नीट परीक्षेमुळे आठवडे बाजार ‘बंद’
Published On: मे 3, 2025 7:24 pm

---Advertisement---
---Advertisement---