HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती आहे.
उद्या 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यर्थ्यांना उद्या १ वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. याबात बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
येथे पहा बारावीचा निकाल
– hscresult.mkcl.org
– mahahsscboard.in
– msbshse.co.in
– mahresult.nic.in
असा पहा निकाल
बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
‘महाराष्ट्र बोर्ड १२वी निकाल २०२५’ लिंकवर क्लिक करा.
रोल नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा
तुमचा बोर्ड निकाल स्क्रीनवर उघडेल.
निकाल तपासल्यानंतर, तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता आणि ती तुमच्याकडे ठेवू शकता.