---Advertisement---

पाचोऱ्यात ‘डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उद्याना’चे उद्घाटन

---Advertisement---

विजय बाविस्कर
पाचोरा :
येथील बाहेरपुरा भागात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यानचे उदघाटन खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदाराकडे जिल्ह्यातून अनेक मागण्या असतात, पण निधी किंवा फंडची कमतरता असल्यामुळे काही काम उशिरा होतात, पण हे उद्यान केंद्र शासनाच्या विशेष साहाय्य निधीतून केले आहे. म्हणजे आपण सोय करू शकतो, तशी तयारी हवी. एक खासदाराच्या हातात केंद्राकडून येणाऱ्या मोठ्या योजना असतात त्यात, रेल्वे, नॅशनल हायवे, एअरपोर्ट यासारखे. छोटी कामे एवढी नसतात, पण यापुढे पाचोरा शहरात जमले तर नक्की आणखी काही गोष्टी करू, असे मत खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.

शहराचा हा भाग मागास मोलमजुरी करणारा आहे, त्यामुळे इथे काही करणे म्हणजे सगळे काम आपल्याला, म्हणजेच लोक प्रतिनिधीलाच करणे आहे. शहरासाठी सूतगिरणीदेखील मंजुर झाली आहे. त्यातून 200, 250 युवकांना रोजगार प्राप्त होईल, असे म्हणत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याकडे, पाचोरा येथे मंजुर झालेल्या एमआयडीसीत मोठ्या कंपनी आणून द्या. यामुळे शहरातील, तथा तालुक्यातील युवकांना त्यांच्याच भागात रोजगार मिळेल, अशी मागणीही केली.

आता नागरिकांना मंगल कार्यालय घ्याची गरज नाही

शहरातील जवळपास सर्व ओपन प्लेस सुशोभीकरण झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांना मंगल कार्यालय घ्याची गरज नाही. एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही. तसेच 2 वर्ष अजून चालतील एवढे कामा मंजूर झाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासाची गती थांबणार नाही उलट अधिक होत जाईल, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment