HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागून होते. दरम्यान आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
आज इयत्ता बारावीच्या परीक्षेचा जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१ .८८ टक्के लागला आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.
बारावीच्या परीक्षेला १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यापैकी १३ लाख ८७ हजार ४६८ विद्यार्थी म्हणजेच ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.४९ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. – hscresult.mkcl.org– mahahsscboard.in– msbshse.co.in– mahresult.nic.in.
बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच ९० ते ९९ .९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ४ हजार ५६५ आहेत.
HSC Result 2025: बारावीचा निकाल जाहीर,यंदाही मुली ठरल्या वरचढ
Updated On: मे 5, 2025 1:18 pm

---Advertisement---
---Advertisement---