Career After 12th: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१ .८८ टक्के लागला आहे. दरम्यान बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. विध्यार्थ्यानी पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय, त्यांचे स्वप्न काय यावरुन विध्यार्थी करिअरची निवडू शकतात. बारावी झाल्यानंतर विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेत पदवीचे शिक्षण घेऊ शकतात. याचबरोबर तुम्ही दुसराही कोर्स करु शकतात.
कला (Arts)
जर तुम्ही कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर त्यानंतर तुम्ही बी.ए, बी.बी.ए, एम.बी.ए पदवी प्राप्त करू शकतात डी.एड, फॅशन डिझाइनिंग डिप्लोमा, एलएलबी देखील करू शकतात. तसेच B.A Economics मध्ये शेअर मार्केट, GDP, बिझीनेस अँड फायनान्स, डिमान्ड अँड सप्लाय अशा अर्थकारणाशी संबंधीत विषयांमध्ये रस असणाऱ्या व्यक्तींनी या क्षेत्राची निवड करू शकतात. पुढे त्याला मास्टर्सची जोड दिली तर इकोनॉमिस्ट, इकोनॉमिक रायटर, बँकर, इन्व्हेस्टमेंट, ॲनलिस्ट, मार्केट ॲनालिस्ट, ऑपरेशन मॅनेजर या आणि अशा अनेक करिअर संधी चांगल्या पॅकेजसह उपलब्ध होऊ शकतात.
वाणिज्य (Commerce)
जर तुम्ही वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही B.com, BCA, CA, B.Arch पदवी प्राप्त करु शकतात. याचसोबत ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर एमबीए, मास्टर्स, बी.एड, एम.एड, एल.एल.बी. पदवी प्राप्त करु शकतात. B. Com in business administration, या क्षेत्रात पदवी मिळवल्यानंतर फायनान्स, अकाउंटिंग, मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रात करिअर करू शकतात.
विज्ञान (Science)
जर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर पुढे ग्रॅज्युएशन, मास्टर्स, आयटी (IT) अशा अनेक विषयात पदवी प्राप्त करु शकतात. तुम्ही एन.डी.ए (NDA) परीक्षा देऊन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये (Air Force) काम करु शकतात.
जर तुम्ही बारावीची परिक्षा PCB ग्रुप घेऊन उत्तीर्ण झाला असाल तर MBBS, Bachelor of dental surgery, Veterinary science and animal husbandry, medical lab and technology, Physiotherapy, Biotechnology, B.Sc. forensic science, यात पदवी घेऊ शकतात.