Viral News : हल्ली तरुणाई भरकटल्याची परिस्थिती आहे. प्रेमाच्या नावाखाली कोण काय करेल याचा नेम नाही. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून तब्बल ४०० हुन अधिक विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ तयार केले. एवढंच नव्हे तर ते व्हिडिओ या तरुणीच्या प्रियकराने सोशल मीडियावर अपलोडदेखील केले. धक्कादायक असा हा प्रकार एका विद्यार्थिनीच्या लक्षात येताच संबंधित तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून, कारवाईची मागणी करत विद्यार्थिनींनी पोलिस स्टेशनला घेराव घातला आहे.
पोलीस ठाण्याला घेराव घालण्यासाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षांपासून महाविद्यालयात एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून तब्बल ४०० हुन अधिक विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ तयार केले. एवढंच नव्हे तर ते व्हिडिओ या तरुणीच्या प्रियकराने सोशल मीडियावर अपलोडदेखील केले. धक्कादायक असा हा प्रकार एका विद्यार्थिनीला आंगोळीसाठी गेल्यावर लक्षात आला.
त्या विद्यार्थिनीने सांगिलते की, आंघोळ करताना बाथरूमच्या वरून एक हात येताना दिसला. तिने पाहिले असता एका महाविद्यालयीन तरुणीच्या हातात एक उपकरण दिसलं. जेव्हा तिने बाहेर येऊन पाहिले असता ती तरुणी एका उपकरणाने तिचा व्हिडिओ बनवत होती. तिने तात्कळ इतर विद्यार्थिनींना बोलावून संबंधित तरुणीला ताब्यात घेतले आणि महाविद्यालय व्यवस्थापनाच्या स्वाधीन केले.
व्हिडिओ बनवल्याने संतप्त झालेल्या १५० हून अधिक विद्यार्थिनींनी पोलिस स्टेशनला घेराव घातला असून, संबंधित तरुणीला अटक करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, महाविद्यालयात ४०० हून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. ही तरुणी विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ बनवून दिल्लीतील तिच्या प्रियकराला पाठवत होती. ते व्हिडिओ तिचा प्रियकर सोशल मीडियावर अपलोड करत होता.
मोबाईल जप्त
मध्य प्रदेशातील जबलपूरच्या दुमना एअरपोर्ट रोडजवळ असलेल्या IIITDM (डीन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग) महाविद्यालयात हा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.