Stock Market: आठ्वड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजारात तेजी दिसून आली आहे. आजच्या व्यवहारांती सेन्सेक्स 294 अंकांनी वाढून 80,796 वर बंद झाला.तर एनएसईचा निफ्टी 50 निर्देशांक 114.45 अंकांनी वाढून 24,461.15 अंकांवर बंद झाला.
कोणते शेअर्स वधारले ?
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 39 पैकी 19कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. अदानी पोर्ट्स 6.31,आयटीसी 1.87, पॉवर ग्रिड 1.68, टाटा मोटर्स 1.50, एशियन पेंट्स 1.18, हिंदुस्तान युनिलिव्हर 0.98, बजाज फायनान्स 0.79, भारती एअरटेल 0.73 हे शेअर्स वाढीसह बंद झाले.
कोणते शेअर्स घसरले ?
स्टेट बँक ऑफ इंडिया 1.26, एचसीएल टेक 0.22, नेस्ले इंडिया 0.16 टक्के, टेक महिंद्रा 0.10, इन्फोसिस 0.08,अॅक्सिस बँक 0.64, टायटन 0.62 टक्के, इंडसइंड बँक 0.50, हे शेअर्स आजच्या व्यवहारात घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹४.७८ लाख कोटी
आज बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२७.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या मागील व्यापार दिवशी म्हणजे शुक्रवार, २ मे रोजी ४२२.८१ लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.७८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.