सोयगाव,दि.५( प्रतिनिधी) : येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा कला,वाणिज्य,विज्ञान व एम.सी.व्ही.सी. या शाखेचा मिळून ९६.९५% निकाल लागला आहे.एकूण २९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती,त्यापैकी २८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयात सर्वाधिक एम.सी.व्ही.सी.शाखेचा १००% टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेचा ९९.२६, कला शाखेचा ९५.२९ तर वाणिज्य शाखेचा ९२.९८% निकाल लागला आहे.महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये आर्यन उल्हास पाटील ८७.५०% मिळवून प्रथम आला आहे तर दिव्या कैलास पाटील ८५.६७% गुणासह द्वितीय,सर्वेशा भास्कर पाटील ८५.३३% टक्क्यासह तृतीय क्रमांक मिळाला आहे.
कला शाखेत नंदिनी राहुल बि-हारे ७७.१७ % मिळवून प्रथम,दिव्या अतुल सोनवणे ७४.६७% द्वितीय तर अश्विनी कैलास साळवे ७२.५०% तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेत प्रिया लक्ष्मीकांत पवार ७२.३३% प्रथम,गायत्री बाबू चौधरी ६९.३३% द्वितीय तर निखिल पद्माकर पाटील ६९.००% तृतीय आला आहे. एमसीव्हीसी शाखेतून अश्विनी रवींद्र मापारी ७४.००% प्रथम, रूपाली नागराज शेलार ७२.५०% द्वितीय तर सुमित गोकुळ राठोड ७०.००% तृतीय क्रमांक मिळाला आहे.
सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे,सचिव प्रकाश काळे,प्राचार्य डॉ.शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे,कनिष्ठ विभागप्रमुख डॉ.उल्हास पाटील,केंद्र संचालक प्रा.भागवत महालपुरे,डॉ.सुभाष पाटील,प्रा.भारती पाटील,प्रा.स्वाती चव्हाण,प्रा.शंकर कानडे,प्रा.विनोद चव्हाण,प्रा.ए.ए.शेख,प्रा.रवींद्र जाधव,प्रा.अनिल मानकर,प्रा.दिपक लिंबे,प्रा.दिपक कल्याणकर,डॉ.निलेश गाडेकर,प्रा.कमलेश काळे,प्रा.संदीप निकम,प्रा.उदय सोनवणे,यांच्या सह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
HSC Result 2025: संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ९६.९५ % टक्के निकाल
Published On: मे 5, 2025 6:02 pm

---Advertisement---
---Advertisement---